Sunday, March 23, 2008

ऋतु


अलीकडे तुझ्या असण्यापेक्षा,

नसण्याचीच सवय झालीय.

ग्रीष्मही मला आता,

जास्त आवडू लागलाय.

तुझा अबोला आणि, माझ्या मनातले प्रश्न,

यानीच मला उद्धवस्त केलय.

अलीकडे तुझ्या असण्यापेक्षा,

नसण्याचीच सवय झालीय.

वर्षा ऋतुची मला आस नाही,

पण मनातील वादळांना वाट नाही.

तरीही तुझ्या आठवांना,

मी मनातच जपून ठेवलय.

अलीकडे तुझ्या असण्यापेक्षा,

नसण्याचीच सवय झालीय.

सोसाट्याचं वादळ आलं,

अनेक प्रश्न सोडवून गेलयं.

त्या उत्तरांनीच मला,

पार उद्धवस्त केलय.

म्हणून शिशीरातील पानगळही,

मला आवडू लागलीय.

अलीकडे तुझ्या असण्यापेक्षा,

नसण्याचीच सवय झालीय.
२३ मार्च, २००८.

Sunday, March 2, 2008

एक निर्विवाद सत्य

माझं तुझ्यावरील प्रेम एक निर्विवाद सत्य आहे,
हे कालचं नाही, आजचं नाही, युगायुगांच कथ्य आहे.


या कथ्याला युगान्ची बन्धन कशाला???
मी तुझी आणि फक्त तुझीच, हे एकच अमर्त्य आहे,
माझं तुझ्यावरीलहे प्रेम एक निर्विवाद सत्य आहे.

तुझ्या मिठीतचं जगावं, हे एक स्वप्न आहे,
पण तुझ्या नकारापुढे सारं व्यर्थ आहे,
पण माझं तुझ्यावरीलहे प्रेम एक निर्विवाद सत्य आहे.

माझं प्रेम हे तुझ्यासाठी मैत्रीचा अर्थ आहे,
पण मग माझं झुरण, तुझ्यासाठी हास्य आहे,
माझं तुझ्यावरीलहे प्रेम एक निर्विवाद सत्य आहे.

तुझ्या आठवणीत रडणं, माझ्यासाठी नित्य आहे,
आणि तुझं मला टाळणं, एक कटु सत्य आहे,
पण माझं तुझ्यावरीलहे प्रेम एक निर्विवाद सत्य आहे.
हे कालचं नाही आजचं नाही युगायुगांच कथ्य आहे.
०९ जानेवारी, २००८

Sunday, February 17, 2008

गुपित प्रीतीचे उमजे ना........

प्रेमाताल्या त्या गोष्टींना,काय करावे?समाजे ना......
गुपित प्रीतीचे उमजे ना........




Saturday, February 16, 2008

शिवराय नाहीत मुखी 
जगण माझ व्यर्थ, 
शिवरायांचा जयजयकार
माझ्या जगण्याचा अर्थ.

Monday, February 4, 2008

Saturday, February 2, 2008

कधी कधी वाटतं...

कधी कधी वाटतं,त्याच्या घरातला T.V. व्हावं,
नकळतपणे का होईना, त्याच्या डोळ्यासमोर रहावं;

कधी कधी वाटतं, त्याची bike व्हावं,
त्याच्यासोबत दूरदूर हिंडावं;

कधी कधी वाटतं, त्याचा mobile व्हावं,
त्याच्या खिशात त्याच्या ह्र्दयाजवळ रहावं;

कधी कधी वाटतं, त्याची उशी व्हावं,
त्याला मांडीवर घेऊन, त्याचं डोकं थोपटावं;

कधी कधी वाटतं, त्याच्या कुंडीतलं फ़ुल व्हावं,
त्याने प्रेमानं जवळ घेऊन मला कुरवळावं;

कधी कधी वाटतं, वारा व्हावं,
त्याच्या केसातून हात फ़िरवत, मी त्याला कुरवळावं;

कधी कधी वाटतं, एक newspaper व्हवं,
त्याच्याशी नजर भिडवत, त्याच्या डोळ्यांत मिसळावं;

कधी कधी वाटतं, आरसा व्हावं,
तो स्वत:ला न्याहाळत असताना,मी लाजेनं चूर व्हावं;

कधी कधी वाटतं, त्याच स्वप्न व्हावं,
त्याच्या स्वप्नात जाऊन,त्याला जवळ घ्यावं;

कधी कधी वाटतं, एक थेंब व्हावं,
फक्त आनंदाच्या आणि आनंदाच्याच क्षणी त्याच्या गालावरून ओघळावं;

कधी कधी वाटतं, त्याच्या भावना व्हावं,
त्याचं माझ्यावर प्रेम आहे का???????
या प्रश्नाचं उत्तर शोधावं..........
२६ डिसेंबर २००७.

Friday, February 1, 2008

बघ कविता सुचते का?

मूळ कविता,
मुसळधार पाऊस, खिडकीत उभं राहून पहा
बघ माझी आठवण येते का?

हात लांबव,
तळहातांवर झेल पावसाचं पाणी
इवलसं तळं पिऊन टाक
बघ माझी आठवण येते का?

वार्‍याने उडणारे पावसाचे थेंब चेहर्‍यावर घे
डोळे मिटून घे, तल्लीन हो,
नाहिच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये
तो उधाणलेला असेलच, पाण्यात पाय बुडवून उभी
वाळू सरकेल पायाखाली,
बघ माझी आठवण येते का?

मग चालू लाग,
पावसाच्या अगणित सुया टोचून घे
चालत रहा पाऊस थांबेपर्यत, तो थांबणार नाहिच, शेवटी घरी ये
साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये
आता नवर्‍याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का?
दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल
त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ़ेल
तो विचारेल तूला तुझ्या भिजण्याचं कारण, तू म्हणं घर गळतयं
मग चहा कर, तूही घे,
तो उठून पंकज उधास लावेल, तो तू बंद कर
किशोरीचं लाव, बघ माझी आठवण येते का?

मग रात्र होईल तो तुला कुशीत घेईल, तू मला आवडतेस
पण तुही तसचं म्हणं
विजांचा कडकडात होईल,
ढ़गांचा गडगडाट होईल
तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्‍या शरीराकडे बघ
बघ माझी आठवण येते का?

यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पहायला विसरू नकोस
यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर
यानंतर उशीखाली सुरी घे,
झोपी जाण्याचा प्रयत्न कर
येत्या पावसाळ्यात एक दिवसतरी,
बघ माझी आठवण येते का?
कवी,
सौमित्र

कविता सुचत नाही, काव्यान्जलीवर जाऊन पहा
बघ कविता सुचते का?

फोरम वाचून बघ, वाचून बघ गाणी
शब्दांची कर जुळवा-जुळव
बघ कविता सुचते का?

नाम काका, सनील्दा यांच्या कविता वाचुन घे
डोळे मिटून घे, तल्लीन हो
नाहिच जाणवलं काही तर बाहेर पड, रस्त्यावर ये
तो गजबजलेला असेलच, तसाच traffic मध्ये उभा रहा
horn वाजतील गाड्यांचे , बघ कविता सुचते का?

चालत रहा traffic सुतेपर्यत , ते सुटणार नाहिच, शेवटी घरी ये
हात-पाय धुवू नकोस, orkut चालू कर, पुन्हा त्याच काव्यांजलीवर ये
आता कविता लिहिण्याचा प्रयत्न कर,
बघ कविता सुचते का?

दारावर बेल वाजेल, दार उघड,
आई असेल, तिच्या हातातली पिशवी घे, भाजी ती स्वतःच ठेवेल
ती विचारेल तूला तुझ्या आवताराचं कारण, तू म्हणं शब्द हरावलेत,
मग चरोळी कर, आईलाही ऐकव
ती ओवी गुणगुणेल, तू ती शांत ऐक
बघ कविता सुचते का?

मग रात्र होईल, ती तुझ्या स्वप्नात येईल, म्हणेल तू मला आवडतोस
पण तुही तसचं म्हणं,
ती छान हसेल, तुला शब्द सुचतील,
ती जायला निघेल, तिच्या पाठमोर्या देहाकडे बघ
बघ कविता सुचते का??

यानंतर तिच्या सौंदर्यावर कविता करायला विसरू नकोस,
यानंतर बाहेरचा कलकलाट नुसताच ऐकन्याचा प्रयत्न कर,
यानंतर कवितेची वही उशीखाली घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर,
येत्या आठवड्यात एक दिवसतरी,
बघ कविता सुचते का??????
25 जानेवारी 2008