Sunday, March 23, 2008

ऋतु


अलीकडे तुझ्या असण्यापेक्षा,

नसण्याचीच सवय झालीय.

ग्रीष्मही मला आता,

जास्त आवडू लागलाय.

तुझा अबोला आणि, माझ्या मनातले प्रश्न,

यानीच मला उद्धवस्त केलय.

अलीकडे तुझ्या असण्यापेक्षा,

नसण्याचीच सवय झालीय.

वर्षा ऋतुची मला आस नाही,

पण मनातील वादळांना वाट नाही.

तरीही तुझ्या आठवांना,

मी मनातच जपून ठेवलय.

अलीकडे तुझ्या असण्यापेक्षा,

नसण्याचीच सवय झालीय.

सोसाट्याचं वादळ आलं,

अनेक प्रश्न सोडवून गेलयं.

त्या उत्तरांनीच मला,

पार उद्धवस्त केलय.

म्हणून शिशीरातील पानगळही,

मला आवडू लागलीय.

अलीकडे तुझ्या असण्यापेक्षा,

नसण्याचीच सवय झालीय.
२३ मार्च, २००८.

No comments: