काल माझी कविता अचानक सांडली,
नको नको म्हणताना,बेभान धावली,
त्याला शब्दात शोधत, गावभर हिंडली,
डोंगर, दर्या, नद्या तुडवत,चहुदिशांत बागडली,
सैरावरा पळत, त्यालाच शोधत राहीली,
माझ्या भावना पण कोरड्याच,काय करतील बिचार्या ,
त्याच्यापासुन दुर होताना, आधीच मेल्या होत्या सार्या,
कवितेलाच समजावले मी,व्यर्थ तु भटकू नकोस,
शब्दच रुसलेत त्याच्यावर,शब्दात त्याला शोधु नकोस,
मग हळुच बिचारी, डोळ्यांत माझ्या हरवली,
अश्रु बनुन गालावरुन ओघळली,
म्हणुनच कदचित,कविता मला सुचत नाही
भावना कधीच मेल्या माझ्या, शब्दांतही जीव नाही.
1 comment:
kay ahe he :( :(
Post a Comment