यंदा रायगडावर ३४० वा शिवराज्याभिषेक सोहळा २१ जुन रोजी पार पडला. याची देही, याची डोळा पुन्हा एकदा अनुभवण्याचं भाग्य मला मिळालं. शिवाजी महाराज म्हणजे प्रत्येक शिवभक्ताच्या हृदयातील अढळ स्थान...
शिवराज्याभिषेकाला येणार्या प्रत्येकाच्या मनात फक्त आणि शिवराय असतात.दाटलेलं धुकं, ऊन पावसाचा खेळ, कोसळणार्या धबधब्याचं पाणी, हिरवाईने नटलेला रायगड आणि शिव राज्याभिषेकाची झिंग चढलेले शिवप्रभुंचे भक्त....वर्णन करायला शब्दही अपुरे पडतील असा शिव राज्याभिषेक सोहळा....!!
शिव राज्याभिषेकाला निनादणारे मंत्र ऐकताना त्या वेळी पण असचं काहीतरी घडलं असेल, असा विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.भगवा फडकवतानाचा तो क्शण अंगावर सर्रकन काटा आणतो.
खरचं, शिवराय नसते तर???
आपलं अस्तित्त्व काय असतं?? हिंदु धर्म कीती टीकला असता??
एक ना अनेक विचार मनात थैमान घालतात आणि नकळत डोळ्यांच्या कडा ओल्या होतात.
रायगडावर फिरताना मन शिवकालात जातं..
महाराजांनी ह्याचं जगदीश्वराचं दर्शन घेतलं असेलं.... कधीतरी या भुमीला शिव चरणांची धुळ लागली असेल....इथला वारा माझ्या महाराजांच्या अंगा-खांद्यावर खेळला असेल.....
कीती भाग्य सह्याद्रीचं.....
कीती भाग्य या रायगडाचं....
कीती भाग्य इथल्या वार्याचं....
कीती भाग्य या मातीचं.....
आणि नकळतपणे ती माती कपाळी लावली जाते.
शिवप्रभुंच्या मुर्तीसमोर नतमस्तक होताना ऊर अभिमानाने भरून येतो......की हिंदु म्हणून मला जन्म लाभला,मागच्या जन्माचं माहीत नाही पण या जन्मी शिवभक्तीचं बाळकडू मिळालं, शिव राज्याभिषेक सोहळा याची देही, याची डोळा पुन्हा पुन्हा अनुभवण्याचं भाग्य मिळालं.माझ्यासारखी भाग्यवान मीच....
आणि नकळत ओठावर शब्द येतात....
"शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झाली
महाराष्ट्राची माती,
या मातीतचं जन्म लाभला, थोर माझं भाग्य कीती?"
mnyaa.