Sunday, February 17, 2008

गुपित प्रीतीचे उमजे ना........

प्रेमाताल्या त्या गोष्टींना,काय करावे?समाजे ना......
गुपित प्रीतीचे उमजे ना........




Saturday, February 16, 2008

शिवराय नाहीत मुखी 
जगण माझ व्यर्थ, 
शिवरायांचा जयजयकार
माझ्या जगण्याचा अर्थ.

Monday, February 4, 2008

Saturday, February 2, 2008

कधी कधी वाटतं...

कधी कधी वाटतं,त्याच्या घरातला T.V. व्हावं,
नकळतपणे का होईना, त्याच्या डोळ्यासमोर रहावं;

कधी कधी वाटतं, त्याची bike व्हावं,
त्याच्यासोबत दूरदूर हिंडावं;

कधी कधी वाटतं, त्याचा mobile व्हावं,
त्याच्या खिशात त्याच्या ह्र्दयाजवळ रहावं;

कधी कधी वाटतं, त्याची उशी व्हावं,
त्याला मांडीवर घेऊन, त्याचं डोकं थोपटावं;

कधी कधी वाटतं, त्याच्या कुंडीतलं फ़ुल व्हावं,
त्याने प्रेमानं जवळ घेऊन मला कुरवळावं;

कधी कधी वाटतं, वारा व्हावं,
त्याच्या केसातून हात फ़िरवत, मी त्याला कुरवळावं;

कधी कधी वाटतं, एक newspaper व्हवं,
त्याच्याशी नजर भिडवत, त्याच्या डोळ्यांत मिसळावं;

कधी कधी वाटतं, आरसा व्हावं,
तो स्वत:ला न्याहाळत असताना,मी लाजेनं चूर व्हावं;

कधी कधी वाटतं, त्याच स्वप्न व्हावं,
त्याच्या स्वप्नात जाऊन,त्याला जवळ घ्यावं;

कधी कधी वाटतं, एक थेंब व्हावं,
फक्त आनंदाच्या आणि आनंदाच्याच क्षणी त्याच्या गालावरून ओघळावं;

कधी कधी वाटतं, त्याच्या भावना व्हावं,
त्याचं माझ्यावर प्रेम आहे का???????
या प्रश्नाचं उत्तर शोधावं..........
२६ डिसेंबर २००७.

Friday, February 1, 2008

बघ कविता सुचते का?

मूळ कविता,
मुसळधार पाऊस, खिडकीत उभं राहून पहा
बघ माझी आठवण येते का?

हात लांबव,
तळहातांवर झेल पावसाचं पाणी
इवलसं तळं पिऊन टाक
बघ माझी आठवण येते का?

वार्‍याने उडणारे पावसाचे थेंब चेहर्‍यावर घे
डोळे मिटून घे, तल्लीन हो,
नाहिच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये
तो उधाणलेला असेलच, पाण्यात पाय बुडवून उभी
वाळू सरकेल पायाखाली,
बघ माझी आठवण येते का?

मग चालू लाग,
पावसाच्या अगणित सुया टोचून घे
चालत रहा पाऊस थांबेपर्यत, तो थांबणार नाहिच, शेवटी घरी ये
साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये
आता नवर्‍याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का?
दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल
त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ़ेल
तो विचारेल तूला तुझ्या भिजण्याचं कारण, तू म्हणं घर गळतयं
मग चहा कर, तूही घे,
तो उठून पंकज उधास लावेल, तो तू बंद कर
किशोरीचं लाव, बघ माझी आठवण येते का?

मग रात्र होईल तो तुला कुशीत घेईल, तू मला आवडतेस
पण तुही तसचं म्हणं
विजांचा कडकडात होईल,
ढ़गांचा गडगडाट होईल
तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्‍या शरीराकडे बघ
बघ माझी आठवण येते का?

यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पहायला विसरू नकोस
यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर
यानंतर उशीखाली सुरी घे,
झोपी जाण्याचा प्रयत्न कर
येत्या पावसाळ्यात एक दिवसतरी,
बघ माझी आठवण येते का?
कवी,
सौमित्र

कविता सुचत नाही, काव्यान्जलीवर जाऊन पहा
बघ कविता सुचते का?

फोरम वाचून बघ, वाचून बघ गाणी
शब्दांची कर जुळवा-जुळव
बघ कविता सुचते का?

नाम काका, सनील्दा यांच्या कविता वाचुन घे
डोळे मिटून घे, तल्लीन हो
नाहिच जाणवलं काही तर बाहेर पड, रस्त्यावर ये
तो गजबजलेला असेलच, तसाच traffic मध्ये उभा रहा
horn वाजतील गाड्यांचे , बघ कविता सुचते का?

चालत रहा traffic सुतेपर्यत , ते सुटणार नाहिच, शेवटी घरी ये
हात-पाय धुवू नकोस, orkut चालू कर, पुन्हा त्याच काव्यांजलीवर ये
आता कविता लिहिण्याचा प्रयत्न कर,
बघ कविता सुचते का?

दारावर बेल वाजेल, दार उघड,
आई असेल, तिच्या हातातली पिशवी घे, भाजी ती स्वतःच ठेवेल
ती विचारेल तूला तुझ्या आवताराचं कारण, तू म्हणं शब्द हरावलेत,
मग चरोळी कर, आईलाही ऐकव
ती ओवी गुणगुणेल, तू ती शांत ऐक
बघ कविता सुचते का?

मग रात्र होईल, ती तुझ्या स्वप्नात येईल, म्हणेल तू मला आवडतोस
पण तुही तसचं म्हणं,
ती छान हसेल, तुला शब्द सुचतील,
ती जायला निघेल, तिच्या पाठमोर्या देहाकडे बघ
बघ कविता सुचते का??

यानंतर तिच्या सौंदर्यावर कविता करायला विसरू नकोस,
यानंतर बाहेरचा कलकलाट नुसताच ऐकन्याचा प्रयत्न कर,
यानंतर कवितेची वही उशीखाली घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर,
येत्या आठवड्यात एक दिवसतरी,
बघ कविता सुचते का??????
25 जानेवारी 2008

खरचं ! तुझा त्रास होतो.........

तुझा इतका त्रास होतो ,
कधीही आणि कुठेही,
फक्त तुझाच भास होतो........

स्वप्नात माझ्या तुच येतोस,
तरी सकाळी चहात दिसतोस,
खरचं ! तुझा त्रास होतो.

आरशातही तूच हसतोस,
रस्त्यावरही तूच भासतोस,
office च्या lift मध्ये,
liftman ऐवजी तूच दिसतोस,
खरचं ! तुझा त्रास होतो.

computer वर drawing मध्ये,
सोफ्यावरती तूच बसतोस,
quantity sheet मध्ये,
तुझाच code मला दिसतो,
खरचं ! तुझा त्रास होतो.

site वर मग carpenter ही,
गालाताल्या गालात हसतो,
"- - - - - - -"नावाचा sunmica कुठे मिळतो???
म्हणून मला प्रश्न विचारतो,
खरचं ! तुझा त्रास होतो.

office मधून घरी जाताना,
station varahee तूच भासतोस,
रस्त्यावरच्या hoarding मध्ये,
शाहरुख तुझ्या सारखा दिसतो,
खरचं ! तुझा त्रास होतो.

संध्याकाळी मंदीरात,
साईऐवजी तूच दिसतोस,
मग शेजारचा गणपती बाप्पा,
माझ्याकडे बघून हसतो,
खरचं ! तुझा त्रास होतो.

तव्यावरच्या पोळीतही,
तुझाच चेहरा मला दिसतो,
भाजलेल्या हातावरही,
मग फोड़ बनून तूच हसतोस,
खरचं ! तुझा त्रास होतो.

मैत्रीणींशी बोलताना,
फक्त तुझाच topic असतो,
सगळीकडे मला आता,
तु आणि तूच दिसतोस,
खरचं ! तुझा त्रास होतो.

खरचं ! तुझा त्रास होतो,
कधीही आणि कुठेही,
फक्त तुझाच भास होतो,
फक्त तुझाच भास होतो.......

११ जानेवारी २००८.