जगातली सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण....!!
माणसाचं मन आठवणींनी भरलेलं असतं.प्रत्येकाच्या मनात असंख्य आठवणी दडलेल्या असतात.गोड-कटू आठवणींचा एक कप्पा प्रत्येकाच्या ह्रुदयात असतोच असतो. आठवण ठरवून कधीच येत नाहीत. कुठल्याही बेसावध क्शणी ती मनात डोकावते आणि नकळत मन मग भुतकाळात डोकावु लागतं आणि मग सुरू होते आठवणींची स्पर्धा....!!
काही आठवणी सुखद असतात, एकांतात त्या सोनेरी क्शणांची उजळणी सुरू होते.
"त्याची माझी पहिली भेट...
भेटीचं ठीकाण ते बालगंधर्वचं गेट...
दोघांनी शेअर केलेला उत्तपा...
उगीचचं मारलेल्या त्या गप्पा...
त्याने पाहीलेली माझी वाट....
रस्ता क्राँस करताना त्याने धरलेला हात....
त्याने कवितेतून घातलेली साद...
माझ्या कवितेला येणारी त्याची दाद..."
सारं कसं काल-परवा घडुन गेल्यासारखं.त्याची आठवण मनाला सुखाचा शिडकाव करते. तो जवळ नसला तरी त्याच्या जवळ घेऊन जाते.खरचं...!! त्याची खुप आठवण येते.
पण दुसर्याचं क्शणी आठवतो,
"त्याचा माझा वाद...ते गैरसमज...
कधीही न भेटण्यासाठी त्याने घातलेली शपथ...आणि कायमस्वरुपी दुरावलेली दोन मनं....!!"
खरचं...! आठवणी खुप त्रास देतात. एका क्शणात हव्याशा वाटणार्या आठवणी जीवाला घोर लावतात. कुठे असेल तो? कसा असेल तो? त्याला माझी 'आठवण' येत असेल? सारे प्रश्न आणि त्यांची नसलेली उत्तर...पण या प्रश्नांची उत्तर शोधण्यातही काही अर्थ नाही. कारण त्यांच्याही उद्या आठवणी होणार. चंद्रशेखर गोखलेंनी दुखरी आठवण चारोळीत सोप्या शब्दांत व्यक्त केलीय,
'विसरायची म्हणुन
एक आठवण जपलेली
अशीच एक वेदना
समजुतदारपणे झोपलेली.'
1 comment:
अतिशय सुन्दर कवीता
Post a Comment