Friday, January 18, 2008

आस तुझ्या भेटीची
जीवा लावी ओढ
आठवणीत तुझ्या सख्या
आसुही लागे गोड

Tuesday, January 15, 2008

जगातली सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण....!!
माणसाचं मन आठवणींनी भरलेलं असतं.प्रत्येकाच्या मनात असंख्य आठवणी दडलेल्या असतात.गोड-कटू आठवणींचा एक कप्पा प्रत्येकाच्या ह्रुदयात असतोच असतो. आठवण ठरवून कधीच येत नाहीत. कुठल्याही बेसावध क्शणी ती मनात डोकावते आणि नकळत मन मग भुतकाळात डोकावु लागतं आणि मग सुरू होते आठवणींची स्पर्धा....!!
काही आठवणी सुखद असतात, एकांतात त्या सोनेरी क्शणांची उजळणी सुरू होते.
"त्याची माझी पहिली भेट... भेटीचं ठीकाण ते बालगंधर्वचं गेट... दोघांनी शेअर केलेला उत्तपा... उगीचचं मारलेल्या त्या गप्पा... त्याने पाहीलेली माझी वाट.... रस्ता क्राँस करताना त्याने धरलेला हात.... त्याने कवितेतून घातलेली साद... माझ्या कवितेला येणारी त्याची दाद..."
सारं कसं काल-परवा घडुन गेल्यासारखं.त्याची आठवण मनाला सुखाचा शिडकाव करते. तो जवळ नसला तरी त्याच्या जवळ घेऊन जाते.खरचं...!! त्याची खुप आठवण येते.
पण दुसर्याचं क्शणी आठवतो,
"त्याचा माझा वाद...ते गैरसमज... कधीही न भेटण्यासाठी त्याने घातलेली शपथ...आणि कायमस्वरुपी दुरावलेली दोन मनं....!!"
खरचं...! आठवणी खुप त्रास देतात. एका क्शणात हव्याशा वाटणार्या आठवणी जीवाला घोर लावतात. कुठे असेल तो? कसा असेल तो? त्याला माझी 'आठवण' येत असेल? सारे प्रश्न आणि त्यांची नसलेली उत्तर...पण या प्रश्नांची उत्तर शोधण्यातही काही अर्थ नाही. कारण त्यांच्याही उद्या आठवणी होणार. चंद्रशेखर गोखलेंनी दुखरी आठवण चारोळीत सोप्या शब्दांत व्यक्त केलीय,
'विसरायची म्हणुन एक आठवण जपलेली अशीच एक वेदना समजुतदारपणे झोपलेली.'
नि:शब्द त्याच प्रेम नजरेआड दडलं होत नजरेच्या त्या जादुवर मन माझं जडलं होत.

Monday, January 14, 2008

घायाळ

तव प्रितीने मी घायाळ झाले,
नयन बाणांनी तव मजला,
घायाळ केले...................

तुझीया कवेत विसावताना,
क्षणही गोठला,
तुझीया श्वासांचे संगीत,ऐकण्यासाठी,
काळही थांबला,
तू ओठांवर ओठ टेकताना,
भान न उरले,भान न उरले..............

तुझीया श्वासात माझा,
श्वास मिसळला,
तुझीया स्पर्शात मला,
स्वर्ग दूर न उरला,
तुझीया ओठांचे अमृत,
मी मनसोक्त प्याले, मनसोक्त प्याले........

तुझीया स्पर्शाची जादू अजब,
तुझीया श्वासांचे संगीत गजब,
तूच तू, चहुकडे,
काही न उरले, काही न उरले.........

९ जानेवारी, २००८.

मिलन

धुंद एकांत,क्षणही शांत,
दोन जीवंची,गुंतागुंत.

अशी अनामिक,ओढ़ एक,
दोन्ही देही,घालमेल.

श्वासत श्वास,एक आस,
ह्रुद्दय झाले,प्रेमातुर.

तनुस तनु,स्पर्शास स्पर्श,
स्परशातुन उमले,नवीन अर्थ.

ह्रुदयास ह्रदय,ओठास ओठ,
हवेहवेसे हे,अमृत.

धुंद देह,बेधुंद आवेग,
दोन जीवांचे,झाले मिलन.
१५ जानेवारी, २००८.
पुण्य अन पावन 
मला शिवरायांचे चरण...
या मातीतच यावे मला
शिव-चरणी मरण.
तू आठवण काढलीस
कि मला उचकी लागते
मी तुझ्या आठवणीत
रात्र रात्र जागते 

खरचं ! तुझा त्रास होतो.........

तुझा इतका त्रास होतो,
कधीही आणि कुठेही।
फक्त तुझाच भास होतो...........

स्वप्नात माझ्या तू येतोस,
तरी सकाळी चहात दिसतोस,
खरचं ! तुझा त्रास होतो.........

आरशातही तूच हसतोस,
रस्त्यावरही तूच भासतोस,
office च्या lift मध्ये ,
liftman ऐवजी तूच दिसतोस,
खरचं ! तुझा त्रास होतो.........

computer वर drawing मध्ये,
सोफ्यावारती तूच बसतोस,
quantity च्या sheet मध्ये,
तुझाच code मला दिसतो,
खरचं ! तुझा त्रास होतो.........

site वर मग carpenter ही,
गाल्यातल्या गालात हसतो,
"-------" नावाचा sunmica कुठे मिळतो?
म्हणून मला प्रश्न विचारतो,
खरचं ! तुझा त्रास होतो.........

office मधून घरी जाताना,
station वरही तूच भासतोस,
रस्त्यावरच्या hoarding मध्ये,
शाहरुख तुझ्या सारखा दिसतो,
खरचं ! तुझा त्रास होतो.........

संध्याकाळी मंदीरात,
साईऐवजी तूच दिसतोस,
मग शेजारचा गणपती बाप्पा,
माझ्याकडे बघून हसतो,
खरचं ! तुझा त्रास होतो.........

तव्यावरच्या पोळीतही,
तुझाच चेहरा मला दिसतो,
भाजलेल्या हातावरही,
मग फोड़ बनून तूच हसतोस,
खरचं ! तुझा त्रास होतो.........


मैत्रीणींशी बोलताना,
फक्त तुझाच topic असतो,
सगळीकडे मला आता,
तु आणि तूच दिसतोस,
खरचं ! तुझा त्रास होतो.........

खरचं ! तुझा त्रास होतो
कधीही आणि कुठेही।
फक्त तुझाच भास होतो,फक्त तुझाच भास होतो..........

११ जानेवारी २००८.